नवी दिल्ली प्रतिनिधी । रशियातील कॅस्पियस्क येथे मॅगोमेद सलाम उमाखानोव्ह स्मृती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या 4 बॉक्सरांनी प्रवेश केला आहे.
याबाबत माहिती अशी की, पुरुष गटात भारताचा नीरज (५७ किलो) आणि जॉनी (६० किलो) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर महिला गटामध्ये पूजा रानी (७५ किलो), लव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो) यांनी उपांत्य फेरी गाठली. भारताच्या पिंकी जांग्राला (५१ किलो) मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.