पाकच्या युद्ध सरावावर भारताची करडी नजर

pak

नवी दिल्ली वृत्तसंस्था । अरबी समुद्रात पाकिस्तानी नौदलाचा युद्ध सराव सुरू असून काही दिवसात समुद्रात रॉकेट आणि क्षेपणास्त्राद्वारे युद्धसराव करत आहेत. या युद्धसरावामुळे भारत सतर्क असून, काही युद्धनौका, पानबुड्या, गस्तीवरील विमानांसह लढाऊ विमान तैनात करण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत प्रचंड तणाव आहे. पाकिस्ताननं अनेकदा अणुबॉम्ब हल्ल्याची धमकीही दिली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनुसार, पाकिस्तानच्या युद्ध सरावावर करडी नजर ठेवली जात आहे. पाकिस्ताननं धाडस केलं तर, भारतीय सुरक्षा दले त्या परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानी सैन्य किंवा तेथील दहशतवादी संघटनांकडून हल्ल्याचा धोका वाढला आहे. ‘पाकिस्तानचा हा युद्ध सराव नियमित प्रक्रियेचा भाग आहे. मात्र, त्यांचा विचार कधीही बदलू शकतो.’ असंही सूत्रांनी सांगितलं. पाकिस्ताननं उत्तर अरबी समुद्रातून जाणाऱ्या मालवाहू जहाजांसाठी सतर्कतेचा इशारा दिला असून, २५ ते २९ सप्टेंबरपर्यंत बंदूक, क्षेपणास्त्र, रॉकेटद्वारे युद्धसराव सुरू राहील, अशी माहिती दिली आहे.

Protected Content