मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला टीम इंडियामधून वगळण्यात आले आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सिराजला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. याशिवाय, इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतूनही सिराजचे नाव गायब होते. यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या टी- 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती आणि त्यातही सिराजचे नाव नव्हते.


२०२३ मध्ये भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात सिराज टीम इंडियाचा भाग होता. याशिवाय, जून 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकातही सिराज टीम इंडियाचा भाग होता, परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याला टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले नव्हते.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाचा संघ जाहीर
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (हर्षित राणा एकदिवसीय मालिका खेळेल), मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग


