भूतान येथे भारतीय लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर कोसळले

chiata

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भूतान येथे भारतीय लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन पायलट शहीद झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज भूतानच्या योंगफुला येथे ही घटना घडली आहे. अरुणाचल प्रदेशाच्या खिरमू येथून योंगफुलाकडे जात असताना हे विमान कोसळले आहे. त्यात दोन पायलट शहीद झाल्याचे आर्मीचे प्रवक्ते, कर्नल अमन आनंद यांनी सांगितले. विमान आणि हेलिकॉप्टर कोसळण्याची देशातील ही या वर्षातली ११ वी घटना आहे. वर्षभरात ९ लढाऊ विमाने आणि २ हेलिकॉप्टर कोसळले असून त्यात १२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यापूर्वी रायगड जिल्ह्यातील मुरुडजवळच्या नांदगावात तटरक्षक दलाचे चेतक हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत होलिकॉप्टरमधील एक महिला जखमी झाली होती, तर 3 जण जखमी झाले होते.

Protected Content