टिम इंडियाच ‘चँपिअन’ : न्यूझीलंडवर रोमांचक लढतीत विजय !

दुबई-वृत्तसेवा | चँपिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर रोमांचक लढतीत विजय संपादन करत या चषकाचे विजेतेपद पटकावले आहे.

आज चँपीअन्स करंडकाच्या अंतीम फेरीत न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे किवीज फक्त 251 धावाच करू शकले. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली. रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी 105 धावांची भागिदारी केली. शुभमन 31 धावा करून बाद झाला. यानंतर विराट फक्त एक धाव काढून बाद झाला. रोहितने जोरदार फटकेबाजी केली. तो 76 धावा काढून बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी भारतीय संघाला आकार दिला. श्रेयस 48 धावा काढून बाद झाला. नंतर अक्षरने फटकेबाजी करून भारतीय संघाला विजयाकडे नेले. मात्र तो 29 धावा काढून बाद झाला.

यानंतर मात्र के.एल. राहूल आणि हार्दीक पांड्या यांनी सावध खेळी करत भारताचा विजय साकार केला. हार्दीक पांड्या १८ धाव करून बाद झाला, मात्र तोवर भारताचा संघ विजयाकडे पोहचला होता. भारतीय संघाने चँपिअन्स ट्रॉफीमध्ये विजय संपादन करताच देशभरात प्रचंड जल्लोष करण्यात येत आहे. ठिकठिकाणी आतषबाजी करून या विजयाचे स्वागत करण्यात येत आहे.

Protected Content