किंगस्टर वृत्तसंस्था । भारत-वेस्ट इंडिज मालिकेतील दुसऱ्या कसोटीला आज दि. 30 ऑगस्ट रोजी सुरुवात होते आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने वेस्ट इंडिज दौऱ्यावरील पहिली कसोटी ३१८ धावांनी जिंकली. त्यामुळे पंतच्या अपयशाकडे तसे दुर्लक्ष झाले; पण आजपासून सबायना पार्क येथे रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटीत पंतने कसोटीला साजेसा खेळ करणे फार महत्त्वाचे आहे. ‘येथील वातावरण मस्त आहे, तर खेळपट्टीही चांगली दिसते आहे. तेव्हा भारतीय संघाकडून पुन्हा चौफेर कामगिरीची अपेक्षा करायला हरकत नाही,’ असा विश्वास भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी बुधवारी व्यक्त केला. हा पंतसाठी अप्रत्यक्ष इशारा असू शकेल; कारण पहिल्या कसोटीत जवळपास प्रत्येक फलंदाज धावा करत असताना पंत मात्र अपयशी ठरला. पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराहच्या सहा विकेट आणि इशांत शर्माने आठ मोहरे टिपत वेस्ट इंडिज संघाच्या मर्यादा दाखवून दिल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन अंतिम अकरामध्ये बदल करण्याची शक्यता खूपच कमी आहे.