नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यातील तीन जागांवर आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इंडिया आघाडीला जम्मू काश्मीर राज्यात मोठे खिंडार पडले आहे.
या राज्यातील दोन प्रमुख पक्ष फारूख अब्दूल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मेहबूबा मुफ्ती यांचा पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी इंडिया आघाडीत असताना ही त्यांनी एकमेकांविरूध्द निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, नॅशनल कॉन्फरन्स राज्यातील तीनही लोकसभेच्या जागांवर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या जागांवर आम्ही ही निवडणूकी लढवू.