साऊदँम्टन वृत्तसंस्था । रोहित शर्माच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या बळावर भारताने दक्षीण आफ्रिकेला पराभूत करून विश्वचषकाची वाटचाल सुरू केली आहे.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत आफ्रिकेच्या सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडलं. तर चहलने स्थिरावू पाहणार्या रासी दुसेर आणि फॅफ ड्युप्लेसिसची जोडी फोडत रासी दुसेनला(२२) चहलने त्रिफळाचीत केलं. तर याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चहलने कर्णधार फॅफ ड्युप्लेसिसला त्रिफळाचीन केले. यानंतर जेपी ड्युमिनीला(३) कुलदीप यादवने तंबूमध्ये धाडलं. या पाठोपाठ चहलने अँडिले फेहलुकवायोला(३४) आणि डेव्हिड मिलरला(३१) बाद केले. मात्र ख्रिस मॉरिसने फटकेबाजी करत ४२ धावा करून संघाला दोनशेचा आकडा गाठून दिला. चहलने सामन्याच्या ३६ व्या षटकात बाद केलं. चहलने १० षटकांत ५१ धावा देत ४ गडी बाद केले. तर बुमराह व भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी दोन गडी आणि कुलदीपने एक गडी बाद करून त्याला समर्थ साथ दिली.
दरम्यान, भारताची सुरवातही डळमळीत झाली. शिखर धवन (८) आणि विराट कोहली (१८) हे लवकर बाद झाल्याने भारतीय फलंदाजांवर दडपण आले. मात्र रोहित शर्माने लोकेश राहूलच्या मदतीने आगेकुच सुरू केली. लोकेश राहूल बाद झाल्यानंतर रोहितने धोनीच्या मदतीने भारताला विजयाच्या समीप नेले. तर शेवटी हार्दीक पंड्याने जोरदार फटकेबाजी करून भारताला विजय मिळवून दिला. नाबाद १२२ धावांची खेळी करणार्या रोहितला सामनाविराच्या पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले.