Home क्रीडा भारताचा कांगारूंवर दणदणीत विजय

भारताचा कांगारूंवर दणदणीत विजय

0
104

अ‍ॅडलेड वृत्तसंस्था । कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जोरदार फलंदाजीच्या जोरावर भारताने आजच्या एकदिवसीय सामन्यात यजमानांना पराभूत केले.

यजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २९८ धावा केल्या. शॉन मार्शनं शतक (१३१ धावा) ठोकलं. ग्लेन मॅक्सवेलनं शेवटी जोरदार फटकेबाजी करून ४८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं २९९ धावांचं दिलेलं आव्हान दिल्यानंतर भारताच्या डावाची चांगली सुरुवात केली.मात्र, ३२ धावांवर खेळत असताना शिखर बाद झाला. त्यानंतर आलेल्या विराटनं सुरुवातीला संयमी खेळी केली. त्यानं १०४ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीनं ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला दिनेश कार्तिकने (२५) चांगली साथ दिली. यामुळे भारताने सहा गड्यांनी विजय मिळवत मालिकेत बरोबरी केली आहे. दरम्यान, शतकी खेळी करणार्‍या विराट कोहली याला सामनाविराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound