Home Cities धरणगाव अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा रोटवद येथे प्रचार दौरा

अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा रोटवद येथे प्रचार दौरा

0
31


WhatsApp Image 2019 10 13 at 6.20.45 PM

धरणगाव, प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण तसेच धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा रोटवद गावात झंझावाती प्रचार दौरा आज रविवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहाने पार पडला.

अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांची व स्थानिक जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे यांचे गावातील महिलांनी जागोजागी औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले. यावेळी गावातील नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी गटातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून आले. तसेच नागरिकांनी प्रचार दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता होता. यावेळी जानकीराम पाटील, साकरे येथील सरपंच राजू कोळी तसेच लक्ष्मण गंगाराम पाटील यांचे असंख्य कार्यकर्ते तसेच रोटवद येथील सरपंच, ग्रा.पं.सदस्य, नांदेड-साळवा-बांभोरी गटातील शक्ति प्रमुख भगवान पाटील, मोरेश्वर अत्तरदे, सचिन पाटील उपस्थित होते. त्यांच्यासोबत बूथ प्रमुख भास्कर पाटील, मधुकर पाटील, ज्ञानेश्वर कोळी, धिरज इंगळे, रविंद्र बावीस्कर, संदीप गोपाळ, मंगेश, लक्ष्मण सैंदाणे, विनायक भोळे, सीताराम बर्हाटे, जगदीश कोळंबे आणि गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound