यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण संस्थेचे संचालक सुनील भोईटे यांच्या हस्ते भारत मातेचे प्रतिमापूजन करून करण्यात आले.
नंतर देशभक्तीपर मनोगत व गीत गायन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या. यात खुशी लहाने (12 वी कला) हिने मनोगतात क्रांतिकारकांच्या बलिदानाने तरुणांमध्ये देश अभिमानाच्या भावना जागृत केल्या. तसेच सुचिता बडगुजर (टी वाय बी एस्सी) व देवयानी बडगुजर (एस वाय बी कॉम) यांनी वैयक्तिक देशभक्तीपर गीत गायन केले तर वैष्णवी माळी व ग्रुप यांनी समूहगीत गायन करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, प्रा. एम. डी. खैरनार व डॉ. हेमंत येवले तर कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. पी. कापडे डॉ. आर. डी. पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मनोज पाटील यांनी केले तर आभार प्रा. एम. डी. खैरनार यांनी मानले. कार्यक्रमात वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने हजर होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अरुण सोनवणे, प्रा. सि. के. पाटील, प्रा. मुकेश येवले, प्रा, नरेंद्र पाटील, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, अनिल पाटील, प्रमोद कदम, प्रमोद जोहरे, प्रमोद भोईटे, अमृत पाटील, दशरथ पाटील, नवमेश तायडे, शाहरुख तडवी राज्जीक शहा, हेमलता बारी यांनी परिश्रम घेतले.