जळगाव प्रतिनिधी । महिला पोलीस कर्मचारीला अश्लिल शिवीगाळ करून मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्या जळगाव जिल्हा पोलीस दलात नोकरीला आहेत. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अनिल चुडामण तायडे रा. जळगाव यांनी महिलेला तिच्या घर येवून अश्लिल शिवीगाळ केली. तसेच दुचाकीचे सीटी फाडून नुकसान केले आणि मुलाला मारून टाकेल अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ फिरोज तडवी करीत आहे.