चिंतेत वाढ : जिल्ह्यात आज आढळले ८७ कोरोना बाधित रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोविड रुग्णालयाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार दिवसभरात एकुण ८७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरासह भुसावळ तालुक्यात रुग्णांची संख्या अधिक आहे.

जळगाव शहर-१६, जळगाव ग्रामीण-०१, भुसावळ-४०, अमळनेर-०५, चोपडा-०६, पाचोरा-००, भडगाव-०१, धरणगाव-०१, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-०१, रावेर-००, पारोळा-०२, चाळीसगाव-०९, मुक्ताईनगर-०४, बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातून ०१ असे एकुण ८७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार १२७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

 

 

Protected Content