नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने निम लष्करी दलाचे जवान आणि अधिकार्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ केल्याचे आज जाहीर केले
पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने निम लष्करी दलांच्या जवानांना एक मोठी भेट दिली आहे. गृह मंत्रालयाकडून वरिष्ठ अधिकार्यांच्या विविध भत्यांमध्ये वाढ केली आहे. गृह मंत्रालयाने रविवारी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील निरिक्षक आणि त्यावरील पदावर काम करणार्या अधिकार्यांना देण्यात येणार्या रिस्क आणि हार्डशिप भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा केली. या घोषणेनुसार, सीएपीएफच्या निरिक्षकाचा भत्ता आता ९,७०० रुपयांची वाढून तो १७,३०० रुपये प्रती महिना करण्यात आला आहे. तर अधिकार्यांना मिळणारा भत्ता १६,९०० रुपयांवरुन २५,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.