बीड | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणार्या करूणा शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून त्यांच्या जामीनावरील सुनावणी आता १८ सप्टेंबर रोजी होणार आहे.
करुणा शर्मा बीडमध्ये असताना त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आले होते. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. ६ सप्टेंबरला पोलिसांनी करुण शर्मा यांना न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने करुणा शर्मा यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर त्यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यता आलं. मात्र आता त्यांच्या जामीनावरील सुनावणी ही १८ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.