घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ

gas cylender

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत भरमसाट वाढ केली आहे. घरगुती एलपीजी सबसिडी असलेल्या सिलिंडर गॅसची किंमत 6 रुपयांनी तर तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरच्या किमतीत 22.5 रुपयांची वाढ झाली आहे.

 

 

घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमतीनंतर दिल्लीतल्या रहिवाशांना सबसिडीच्या सिलिंडरसाठी 502 रुपये मोजावे लागणार आहेत. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरसाठी 730हून अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. या किमती 1 मेपासून म्हणजे आजपासून लागू होणार आहेत. दरम्यान, 1 एप्रिललाही सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. तेल कंपन्यांनी सबसिडी नसलेल्या गॅस सिलिंडरच्या किमतीत 5 रुपयांची वाढ केली होती. तर सबसिडीवाल्या सिलिंडरच्या किमतीत 25 पैशांची वाढ नोंदवण्यात आली होती.

Add Comment

Protected Content