एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल-कासोद्यासारख्या मोठ्या गावांसह काही गावांना अल्प पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या अंजनी मध्यम प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्यात सुमारे 12 ते 13 वर्षेंनंतर यंदा 8.80 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आतापर्यंत धरणात एकूण ८.२७ द.ल.घ.मी इतका पाणीसाठा असल्याची माहीती अंजनी मध्यम प्रकल्पाचे सहायक अभियंता श्रेणी-१ सी.आर.बनसोड यांनी दिली आहे.गेल्या २४तासांत १.५४टक्के पाणीसाठा वाढल्याचे सांगण्यात आले. अंजनी नदीच्या उगम परीसरात व धरणाच्या पाणलोट क्षेञात मुसळधार पाऊस झाला तर धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ होऊ शकते. या पार्श्वभुमीवर पाणलोटक्षेञात दमदार पावसाची गरज आहे.श्रावण सरींचा पाऊस हा जमिनीत जिरणारा असल्यामुळे अजूनही तालुक्यातील ओढे,नाले प्रवाहीत झालेले नाहीत.