मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मेंढोळदा गावातील कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे आमदारांनी स्वागत केले.
काल मुक्ताईनगर मतदारसंघातील मेंढोळदा गावातील उस्मान खान,सिराज खान,अल्लाउद्दीन पिंजारी,गणेश धनगर,प्रमोद बेलदार,नितीन जोगी,विशाल कोळी,सोपान बेलदार, सचिन कोळी,सोहम जोगी, राजेंद्र धनगर,सतीश धनगर,गोलू धनगर, निखिल बेलदार तसेच अन्य काही असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

’यावेळी छोटू भोई (शिवसेना तालुकाप्रमुख),गोपाळ सोनवणे,अफसर खान,महेंद्र मोंढाळे,राजू हिवराळे तसेच अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील विविध गावांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून यात आता नव्याने कार्यकर्त्यांची भर पडल्याचे दिसून येत आहे.



