जळगाव प्रतिनिधी । माजी उपमहापौर गणेश सोनवणे यांच्यासह अनेकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
आज शहरातील केमिस्ट भवनात काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात माजी उपमहापौर गणेश सोनवणे, माजी नगरसेवक अण्णा भापसे, सत्यजीत नेमाने यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे मान्यवरांनी स्वागत केले.