यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील फैजपुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष व युवा सामाजिक कार्यकर्ते अनवर खाटीक यांच्या वतीने शहरासाठी मोफत जलसेवा देणाऱ्या टँकरचे लोकापर्ण माजी गुहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम फैजपूर येथील सुभाष चौकात करण्यात आला.
या कार्यक्रमाला पक्षाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा प्रभारी प्रसन्नजित पाटील, श्रीराम पाटील, प्रदेश चिटणीस एजाज मलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वर खाटीक यांच्याव्दारे करण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौत्तुक केले. याप्रसंगी डॉ प्रवीण बोरसे, माजी नगरसेवक शेख जफर, उपनगराध्यक्ष रशिद तडवी, अल्पसंख्यक जिल्हा उपाध्यक्ष शाकीर शेख, युवा नेता वसिम जनाब, सामाजिक न्याय विभाग फैजपुर शहराध्यक्ष अशोक भालेराव, रमजान तडवी, आदीवासी शहराध्यक्ष कांग्रेस शहर उपाध्यक्ष आसिफ मेकॅनिकल, राजोरा सरपंच विकास पाटील, दानिश मेंबर, अफजल खाटीक, जाकीर तडवी हे या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते.