आ. भोळे यांच्या हस्ते चित्र प्रदर्शना’चे उद्घाटन

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व गणेशोत्सवाचे औचित्य साधून जळगाव येथे ‘चित्र प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले होते. या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

साकळी येथील भूमि फाउंडेशन व सुकृतीचा राजा गणेशोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व गणेशोत्सव निमित्ताने स्वातंत्र्यानंतरच्या ७५  वर्षातील विविध घडामोडिंचे ‘चित्र प्रदर्शन’ साकळी तालुका यावल येथील चित्रकारांच्या रेखाटलेल्या चित्रकलेचे  विशेष कौतुक करण्यात आले.  या  चित्रप्रदर्शनचे उद्घाटन आ. राजुमामा भोळे यांनी केले.  साकळी येथील  चित्रकार व पत्रकार चंद्रकांत नेवे व दामोदर नेवे यांनी  रेखाटले होते. त्यांचा सत्कार आ. राजुमामा भोळे यांनी केला.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची भूमिका खुप महत्वाची होती. १८९३  नंतर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातूनच नागरिकांना विशेष करून युवकांना संघटित केले. नंतर तेच संघटित नागरिकांना स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी केले.

सुकृती पिनाकल परिवारातील सर्वच सदस्य, परिवार  विशेष म्हणजे गणेशोत्सव समिती अध्यक्ष चंद्रशेखर अहिरराव , सोसायटीचे अध्यक्ष  अॅड. हेमराज चौधरी ,  जिल्हा सरकारी वकील अॅड.केतन ढाके, जितेंद्र पवार, नोबेल फाऊंडेशनचे जयदीप राजपूत ,डॉ. संदीप पाटील,  डॉ. सुदर्शन पाटील, डॉ. विश्वकर्मा, सचिन कुरंभट्टी,  डॉ. वासुदेव सोनवणे,  योगेश खैरनार, डॉ. अजित नांदेडकर, विपुल पारीख, सचिन शिंदे, पंकज मुक्कावर यांनी चित्रप्रदर्शन पाहिले .

अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित या चित्रप्रदर्शन पाहण्याचा आबालवृद्धांनी आनंद घेतला.  आ. राजूमामा भोळे यांनी भूमि फाउंडेशनच्या डॉ.  सुनिल पाटील,  सुनीता पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. यशस्वीतेसाठी समाधान पाटील,   महेंद्र पाटील,  हेमंत वागळे,  मुकेश मराठे यांनी कामकाज पाहिले.

Protected Content