यावल प्रतिनिधी । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त नेहरू युवा केंद्र व यावल तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावल येथील तहसील कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी प्लॉगींग रॅलीचे शहरात विशेष आकर्षण दिसले. जॉगिंग करता करता कचरा गोळा करत नेहरू युवा केंद्राचे सर्व समन्वयक आणि तालुक्यातील युवक मंडळी सहभागी झाली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन रावेर यावल लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार महेश पवार, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सामाजिक क्षेत्रात काम करणारे अमोल जावळे, युवा उद्योजक युगंधर पवार, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते तथा महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियान सदस्य रणजितसिंह राजपूत, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, उपसभापती योगेश भंगाळे, नेहरू युवा केंद्र जळगाव ऑफिसर नरेंद्र डागर, नेहरू युवा केंद्र अकांउटंट अजिंक्य गवळी, नेहरू युवा केंद्र युथ लीडर तेजस पाटील तथा इतर नेहरू युवा केंद्र समन्वयक पल्लवी तायडे, आनंदा वाघोदे, शुभांगी फासे, मुकेश भालेराव, नेहा पवार, दुर्गेश आंबेकर, कोमल महाजन, रोहन अवचारे तसेच दिनेश बारेला, प्रा. बी जी पवार व दीपक खंबायत तालुक्यातील इतर पदाधिकारी मंडळी उपस्थित होती.
यावेळी रक्षा ताई यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छ भारत अभियान विषयी माहिती दिली तर प्रांतधिकारी साहेब यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले. संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रास्ताविक नरेंद्र डागर सर तर सूत्रसंचालक शुभांगी फासे आणि आभार तेजस पाटील यांनी मानले.
——————–