फैजपूरात श्रीराम मंदिर निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन

फैजपूर प्रतिनिधी । शहरातील बसस्थानकाच्या समोरील व्यापारी संकुलात निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन निधी संकलन प्रमुख महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. 

खारुताईच्या भूमिकेतून सिंहाचा वाटा उचलला संतांचे आव्हान अयोध्येतील श्रीराम मंदिर हे देशाची, अस्मिता, अभिमान व दैवत असून या राष्ट्र मंदिराच्या निर्माण कार्यात प्रत्येकाने खारुताईच्या भूमिकेतून सिंहाचा वाटा उचलावा असे आवाहन निधी संकलन प्रमुख महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज व अन्य संतांनी केले. तसेच आरती करून नारळ वाढवण्यात आले.

तत्पूर्वी स्वामी समर्थ मंगल कार्यालय सर्वधर्मीय बैठक होऊन त्यात निधी संकलन संदर्भात चर्चा करण्यात आली व्यासपीठावर भुसावळ  प्रांत निधी संकलन प्रमुख महामंडलेश्‍वर जनार्दन हरी महाराज, स्वामीनारायण गुरुकुलचे अध्यक्ष शास्त्री भक्ती प्रकाश महाराज, खंडोबा देवस्थानचे प्रमुख महाराज महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज यांची उपस्थित होते.

यावेळी आचार्य जनार्दन महाराज यांनी श्रीराम मंदिर हे राष्ट्र कार्य आहे या मंदिर निर्माण यामागील हेतू हा प्रत्येका  मध्ये संघटन, समरसता,  एकता निर्माण व्हावी रामचरित्र प्रत्येक व्यक्तीपर्यंत जावे आहे असे सांगत आपण भाग्यवान असल्याचा उल्लेख करीत आपल्यासमोर मंदिर निर्माण होत आहे त्यामुळे त्यात आपला सहभाग असलाच पाहिजे असे आवाहन केले.

तर शास्त्री भक्ती प्रकाश यांनी   मंदिर निर्माण मध्ये आपला सहभाग ही आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे त्यानंतर आपल्याला कोणीही राम मंदिरासाठी देणगी मागणार नाही त्यामुळे संधीचे सोने करा असे आवाहन केले तसेच पुरुषोत्तमदास महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी अभियान सह प्रमुख दीपक पाटील यांनी मंदिर निर्माण मागील भूमिका विशद केली यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये माजी आमदार राजाराम महाजन, नगराध्यक्षा महानंदा होले, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, जिल्हा दूध संघाचे संचालक हेमराज चौधरी, माजी जि प सदस्य भरत महाजन, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, नगरसेवक देवा साळी , भाजपा शहराध्यक्ष अनंत नेहते, तालुका हिशोबनीस गणेश सूर्यवंशी, नगर प्रमुख लोकेश कोल्हे,  युवराज किरंगे  यांच्यासह शहरातील नागरिक व महिलांची उपस्थिती होती.

निधी संकलनाची दमदार सुरुवात –

यावेळी स्वामीनारायण गुरुकुल तर्फे 1 लाख 21 हजार 111 तर सत्पंथ चारीटेबल ट्रस्टतर्फे एक लाख एक हजार अशी देणगी जाहीर करण्यात आली.

 

Protected Content