चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डेराबर्डी ते चैतन्य तांडा दरम्यान असलेल्या रस्त्यासह इतर गावांना जोडणाऱ्या तब्बल १४ कि.मी च्या रस्त्यासाठी आ. मंगेश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून पावणे बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून याचे शुभारंभ सरपंच अनिता राठोडांच्या हस्ते करण्यात आले.
तालुक्यातील डेराबर्डी ते चैतन्य तांडा, करगांव- तरवाडे ते बोरखेडा – बहाळ दरम्यान असलेल्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. या ठिकाणाहून जाणाऱ्या चालकांना आपले जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागायचा. परंतु करगाव विकास सोसायटी चेअरमन दिनकर राठोड यांनी सदर रस्ता मंजूर करावा यासाठी मंत्रालयाला धडक दिली. अनेक वर्षे पाठपुरावा करण्यात आले. अखेर आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १४.७७५ कि.मी. रस्त्यांसाठी ११ कोटी ७७ लाखांचा भरघोस असा निधी उपलब्ध झाला आहे.
यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेला डेराबर्डी ते चैतन्य तांडा, करगाव ते तरवाडे, बोरखेडा ते बहाळ अशा गावांना जोडणारा रस्ता आता तयार होणार आहे. याचा शुभारंभ चैतन्य तांडा ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता दिनकर राठोड यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच रस्त्याच्या डांबरीकरणासह कॉंक्रेटीकरण होणार आहे. यामुळे गावकऱ्यांच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले जात आहे.
तसेच चैतन्य तांडा गावांच्या हद्दीत कॉंक्रीटीकरण व आरसीसी गटारी, ३०० मि. समाविष्ट केले असून काम पूर्ण झाल्यावर आमदार मंगेश चव्हाण हे लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती चेअरमन दिनकर राठोड यांनी दिली आहे.
याप्रसंगी विजाभजाचे तालुकाध्यक्ष तथा करगाव विकास सोसायटीचे चेअरमन दिनकर राठोड, उपसरपंच आनंद राठोड, माजी चेअरमन बाबूराव सूर्यवंशी, आलीचंद राठोड, सेवानिवृत्त नायब तहसीलदार प्रताप राठोड, सदस्य वसंत राठोड, साईनाथ राठोड, संदीप राठोड, उदल राठोड, रघुनाथ राठोड, रावसाहेब राठोड, खिमा राठोड, दिलीप राठोड, साहेबराव राठोड, संतोष पवार, पोलीस पाटील लखन राठोड, ठेकेदार जितू पुन्शी, कनिष्ठ अभियंता गणेश फसले, दिलीप राठोड, पिना राठोड, दयाराम राठोड, कैलास बापू, प्रकाश महाराज, जालम राठोड, अजित राठोड, महिला विमल राठोड, अरुणा राठोड सर्व ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.