भुसावळ प्रतिनिधी | पोलीस प्रशासनाची गस्त गतीमान होण्यासाठी आज पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते आरएफआयडी प्रणालीचे उदघाटन करण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, भुसावळ शहर, बाजारपेठ व भुसावळ तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत सक्षम व सतर्क पोलीस पेट्रोलिंगसाठी व संभाव्य गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी आरएफआयडी प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून रात्र गस्तीचा आढावा घेता येणार असून कोणत्या भागात पेट्रोलिंग झाली वा नाही याबाबतची माहिती वरीष्ठांना अवगत होणार आहे. या प्रणालीचे लोकार्पण आज जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्याहस्ते शहरातील संतोषी माता सभागृहात करण्यात आले.
यावेळी जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे,प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दीपक धिवरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्यासह तिन्ही पोलीस स्थानकांच्या निरिक्षकांची उपस्थिती होती.
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी प्रास्ताविक केले. यातून त्यांनी भुसावळ हे मोठे शहर असून येथे रेल्वेमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी होत असल्याने गस्त आवश्यक असून आरएफआयडी प्रणालीमुळे गस्त सिस्टीम अद्ययावत होणार असल्याचे सांगितले. तर डॉ. प्रवीण मुंढे यांनी आरएफआयडी डिव्हाईसच्या मदतीने शहरातील गस्तीचे चांगल्या प्रकारे मॉनिटरींग होणार असून यातून प्रभावीपणे कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन केले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/553676832542867