पाळधी ता.धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाळधी बुद्रुक येथील ‘साई ड्रीप इरिगेशन’ या कंपनीच्या पीव्हीसी पाईप युनिटचे उदघाटन आज पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आपल्या मनोगतातून म्हणाले की, “पाणी पुरवठा योजनांमधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच पाईप होय. दर्जेदार उत्पादने असणार्या पाईप उत्पादक कंपन्यांच्या पाईपांना या क्षेत्रात अतिशय उज्जल भविष्य असल्याचे” ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी नमूद केले. पालकमंत्र्यांनी युनिटचे उदघाटन केल्यानंतर याची संपूर्ण पाहणी करून कार्यपध्दती समजून घेतली. यासोबत त्यांनी युनिटच्या आगामी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्यात.
पाळधी बुद्रुक येथील ‘साई ड्रीप’ ही कंपनी इरिगेशनची उत्पादने बनविण्यासाठी प्रख्यात असून आता या कंपनीत पीव्हीसी पाईपचे उत्पादन देखील सुरू करण्यात येणार आहे. कंपनीच्या या नवीन युनिटचे आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील, पाळधी बुद्रुकचे सरपंच प्रकाश पाटील, पाळधी खुर्दचे सरपंच शरद कोळी, धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, माजी सरपंच तथा उद्योजक शरद कासट, दिलीपबापू पाटील, गोपाळ कासट, अलीम देशमुख, पथराडचे माजी सरपंच गोकुळ लंके, कृष्णा साळुंखे, संभाजी चव्हाण, अविनाश पाटील, रामदास चव्हाण, देवीदास पाटील, पन्नालाल पाटील आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविकातून सचिन रमेश झवर यांनी साई ड्रीपची वाटचाल आणि आगामी योजनांबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, आमच्या युनिटच्या माध्यमातून परिसरात पहिल्यांदाच आयएसआय मानांकीत पीव्हीसी पाईपचे उत्पादन करण्यात येणार असून या माध्यमातून परिसरातील तरूणांना रोजगार मिळणार आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय महाजन यांनी केले.