ओढरे येथे ग्लोबल बंजारा संस्थेतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

चाळीसगाव प्रतिनिधी । केंद्र-राज्य सरकारच्या शासकीय व निमशासकीय योजना ह्या तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचावे या दृष्टिकोनातून ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेने कंबर कसली असून तालुक्यातील ओढरे येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

केंद्र – राज्य सरकारच्या शासकीय व निमशासकीय योजना ह्या आजही कागदावरच पहायला मिळत आहे. ग्रामीण भागात योजनेविषयी इत्यंभूत माहिती मिळत नसल्याने अनेकांना योजनेपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे हि अवस्था तालुक्यातील ओढरे येथील नागरिकांवर येऊ नये म्हणून ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी जनसंपर्क कार्यालय जनतेच्या सेवेत रूजू केले आहेत. सदर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवार, २७ जून रोजी आदर्श शिक्षक व कवी एकनाथ गोफणे यांच्या हस्ते सकाळी १० वाजताच्या सुमारास करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अशोक राठोड हे बोलताना या जनसंपर्क कार्यालयांतर्गत रेशन कार्ड, जॉब कार्ड, बांधकाम कामगार नोंदणी, वृद्धपकाळ पेन्शन योजना, दिव्यांगाना मदत, शेती विषयक माहिती, शासकीय योजनांची माहिती व मनी ट्रान्सफर आदी गोष्टी ह्या निःशुल्क सेवा बजावण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले. तसेच दिव्यांग बांधवांचे प्रमाणपत्राचे फॉर्म देखील भरण्यात येणार असल्याने यावेळी निलेश जाधव या दिव्यांग बांधवांचे फॉर्म भरण्यात आले. याप्रसंगी शिक्षक एकनाथ गोफणे, सामाजिक कार्यकर्ता दिनकर राठोड, सप्ताहिक वंचितांचा प्रतिनिधीचे संपादक योगेश्वर राठोड, प्रेरणा दिव्यांग संस्थेचे देवेस पवार, जेष्ठ नागरिक नामदेव राठोड, नवनाथ पवार, ग्रामपंचायत सदस्य गजानन चव्हाण, राहुल राठोड, दशरथ जाधव, किशोर गवळी, सारिका पवार, शिवानंद राठोड, सोमनाथ पवार, सागर जाधव आदी उपस्थित होते.

 

Protected Content