जळगाव (प्रतिनिधी) जीवदया आधार प्रतिष्ठानच्या स्थापना दिनानिमित्त मुक-बधीर विद्यार्थ्यांना नुकताच सकाळचा नास्ता देण्यात आला.
शहरातील नवी पेठेतील मुक बधीर विद्यालयात जीवदया आधार प्रतिष्ठानच्या स्थापना दिनानिमित्त मुक-बधीर विद्यार्थ्यांना सकाळचा नास्ता देण्यात आला. सामाजीक भान ओळखून न संस्थेची स्थापना करण्यात आली असून नास्ता वाटपाचा कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या सामाजीक कार्याची सुरुवात झाली आहे. प्रतिष्ठानचे मुख्य मार्गदर्शक म्हणून डाॅ.प्रसन्नकुमार रेदासनी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केशव स्मृती प्रतिष्ठानचे अपाध्यक्ष निळकंठराव गायकवाड, भरारी फाऊंडेशनचे दिपक परदेशी हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीवदया आधार प्रतिष्ठानचे प्रमोद सोनार,उपाध्यक्ष .ज्ञानेश्वर पाटील, सचिव गणेश शिंपी, खजिनदार सागर पगारीया, सहसचिव जगदीशजी शिंपी, तसेच ईतर सदस्य प्रमोद रेदासनी, रेखाताई अवस्थी, अनिल शिरसाळे, आनंद जैन, चंद्रकांत शिवाजीराव कानडे, विनोद सुर्यवंशी, शाहीद पटेल, राजु जैन, शितलताई अवस्थी आदींची उपस्थिती होती.