भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता भुसावळ शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगावतर्फे आयटीआय परिसर, साईबाबा मंदिराजवळ, जामनेर रोड, भुसावळ येथे कोविड केअर सेंटरचा प्रारंभ (दि.१२ एप्रिल) रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, भुसावळ नगरपरिषद आरोग्य अधिकारी डॉ किर्ती फलटणकर , शासकीय ITI चे प्राचार्य गवई, रा.स्व.संघाचे भुसावळ जिल्हा संघचालक डॉ.विजय सोनी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील,देवगिरी प्रांत प्रचार प्रमुख स्वानंद झारे, प्रशांत देवरे , प्रकल्प प्रमुख केदार ओक, सहप्रमुख प्रविण कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थितीत होते.
कोविड सेंटर मध्ये ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून दाखल रुग्णांसाठी योगासन, सात्विक आहार, तज्ञ व प्रशिक्षीत डॉक्टरांचे उपचार, समुपदेशन करण्यात येणार आहे. उद्घाटन पूर्वी मान्यवरांनी कोविड सेंटर मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी केली. अधिक माहितीसाठी केदार ओक – 9422781375, प्रविण कुलकर्णी 7588814636 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे
https://www.facebook.com/watch/?v=751097275773011