धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माध्यमिक विद्यालय अंजनविहीरे विद्यालयात आंतरशालेय क्रीडा सप्ताहाचे उदघाटन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पिंप्री खुर्द येथील व्यापारी संजय चौधरी हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून निंभोरा दहिदुले ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच सुदर्शन पाटील, वाकटुकी गावातील सरपंच सुरेश पाटील, खामखेडा सरपंच धीरज पाटील, अंजनविहिरे सरपंच गणेशकांत पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत गीताच्या माध्यमातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मानसी चव्हाण, वैष्णवी चव्हाण, कल्याणी साळुंखे, मयुरी सपकाळे व राजश्री पाटील यांनी शब्द सुमनांनी स्वागत केले.
मान्यवरांच्या हस्ते आंतर शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन तसेच छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन संजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. बी. चव्हाण यांनी केले व विद्यार्थ्यांना सांघिक वृत्तीचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय चौधरी यांनी आपल्या बालपणातील आठवणीच्या उजाळा व भावी आयुष्यातील यश आणि अपयश याविषयी माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीते साठी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक एन. एस. पवार, एस. आर. पाटील, बी. यु. चव्हाण, के. आर. साळुंखे, अरविंद माळी, कार्यक्रमाचे छायाचित्रकार काटे, संजू भाऊसाहेब, विलास यांनी अनमोल सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक ए. व्ही. मनोरे यांनी केले तर आभार आर. पी. पाटील सर यांनी मानले.