चाळीसगाव प्रतिनिधी । शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शहरात शिव मदत केंद्राचे उद्घाटन शिवसेना तालुका प्रमुख रमेश चव्हाण यांचा हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.
गेल्या पंधरवाड्यात परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत मिळावी, तसेच झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके आडवी झाली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढे हंगामामध्ये मिळणाऱ्या जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निकडीचा झालेला आहे. या ओला दुष्काळात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. तर शेतीमालासह फळबागांचे अतोनात नुकसान झालेले आहे. यासर्व बाबींचा विचार करता सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत व ओल्या दुष्काळामध्ये आपदग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी. तसेच यासोबत शेतीनुकसानीसाठी हेक्टरी ५० हजार तातडीची मदत मिळावी. म्हणून शिवसेना मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुका प्रमुख रमेश चव्हाण, शहर प्रमुख नाना कुमावत, विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाने, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, शेतकरी सेना उपतालुका प्रमुख सचिन ठाकरे, दिलीप पाटील, अनिल राठोड, दिलीप पाटील, निलेश गायके, बद्री चव्हाण, प्रभाकर उगले, पांडुरंग बोराडे, दिनेश घोरपडे, लक्ष्मण बोराडे, सचिन गुंजाळ, दिनेश विसपुते, बापू लोणकर, अनिल कुडे, अण्णा पाटील, सुभाष राठोड, मनोज कुमावत, सुमित शेळके, किशोर पाटील, तुकाराम पाटील, संदीप पाटील, संजय पाटील, शैलेंद्र सातपुते आणि रघुनाथ कोळी यांच्यासह आदी उपस्थित होते.
संपर्क साधावा
तसेच पीक विमा, तलाठी, ग्रामसेवक यांनी केलेल्या पंचनामाविषयी शेतक-यांनी काढलेल्या पीक विमा बँकेतील खातेविषयी किंवा पंचनामे संदर्भात तक्रारी असल्यास शिवसेना उपजिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, (मो.नं.९४२२७७९२२३) तालुका प्रमुख रमेश चव्हाण (मो. न. ९९२२५८५१८७) आणि शहर प्रमुख नाना कुमावत (मो.नं. ९८६०१६१६१६) यांच्याशी शेतक-यांनी जास्तीत जास्त संपर्क साधून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे यांनी केले आहे.