जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय व अजिंठा फिल्म सोसायटी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या देवगिरी शॉर्टफिल्म महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेता आरोह वेलणकर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी क.ब.चौ उत्तर महारष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, संस्थेचे संचालक किरण बेंडाळे, देवगिरी प्रांत प्रचारक रामानंदजी काळे, डॉ. जयंत शेवतेकर, अभिनेता नितीन वाघ, नेहा जोशी, डॉ.विरेंद्र झांबरे, बाल कलाकार अर्जुन पुर्णपात्रे, उद्योजक प्रकाशसेठ चौबे, प्राचार्य डॉ. गौरी राणे व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी देवगिरी प्रमुख प्रांत प्रचारक रामानंद काळे यांनी सांगितलं की ज्या प्रकारे भारतीय चित्रपट हे लुकिंग इंडिया आहे तसेच, अश्या लहान फेस्टिवल हे भविष्यात मेकिंग इंडिया होतील असे काळे यांनी प्रतिपादन केले. देवगिरी शॉर्टफिल्म मोहोत्सव गेल्या वर्षांपासून होत असल्याने यशस्वी होत आहे. राष्ट्रीय शॉर्टफिल्म जर होत असेल तर कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पूर्ण सहकार्य करेल असं प्रतिपादन प्र. कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी यावेळी सांगितले.
सकाळी स्व.विक्रम गोखले चित्रपट नगरी तुन चित्रपट दिंडी काढण्यात आली होती. त्यानंतर या शॉर्ट फिल्मची सुरवात ‘दुर्दम्य लोकमान्य… तो स्वराज्य सिंह एक’ डाक्युमेंट्री ने करण्यात आली. अभिनेते विक्रम गोखले ह्यांनी ह्या डाक्युमेंट्रीमध्ये निवेदकाची भूमिका केली होती. यावेळी प्रदिद्ध अभिनेता आरोह वेलणकर यांच्या ‘मास्टर क्लास’ मध्ये ‘विचार मांडण्याचे प्रभावी माध्यम चित्रपट’ ह्या विषयावर यांनी मार्गदर्शन केल. “समाजाचं प्रतिबिंब म्हणजे सिनेमा आणि सिनेमाचं प्रतिबिंब म्हणजे समाज.” आपण जे समाजात पाहतो ते लोकांपर्यंत पोहचवण्याच आणि लोकांना साक्षर करण्याचं माध्यम चित्रपट आहेत. शॉर्ट फिल्म , डाक्युमेंट्री माध्यमातून प्रभावी पने मांडता येत. मातृभाषे वरील चित्रपट प्रेक्षकांच्या अधिक हृदयापर्यंत पोहचतात हे साऊथ चित्रपटांनी दाखवून दिलं. सिनेमा थेटर मध्ये जाऊनच बघायचा OTT वर यायची वाट पहायची नाही असही वेलणकर यांनी सांगितलं.
“भगवा ध्वज, भारत माता, सनातन धर्म, हिंदू धर्म इ. घटकांचा उपयोग १०-१२ वर्षांपूर्वीच्या सिनेमात होत नव्हता. आता मात्र चित्र बदललं आहे. चित्रपटात भगवा ध्वज दिसत आहे. असही निरीक्षण वेलणकर यांनी मांडल. “वसाहतवादी वृत्तीतून आपल्या मनावर अस बिंबवण्यात आलं की आपल्या रूढी, परंपरा वाईट आणि पाश्चात्यांच्या चांगल्या ही विचारसरणी आधी बदलली पाहिजे आणि हे बदलायचं असेल तर चित्रपट हे माध्यम बदलवू शकतो असं मत वेलणकर यांनी मांडलं.
दुसऱ्या मास्टर क्लास मध्ये चित्रपट व्याकरण कथाकार प्रा. शिवदर्शन कदम यांनी मार्गदर्शन केलं. जशी वाचण्या-लिहिण्याची भाषा असते देहबोली म्हणजे शरीर भाषा, संगीतची भाषा, चित्रपटाची भाषा असते अगदी तशीच सिनेमाची देखील भाषा असते. सिनेमाला भाषा असल्यामुळे त्याला व्याकरण देखील असत.
“सिनेमा हा कवितेजवळ घेऊन जाणार माध्यम आहे.”
“उत्कृष्ट सिनेमा तयार करण्यासाठी तंत्रज्ञाना बरोबरच तंत्राची माहिती असणे अवश्य आहे. त्यासाठी साहित्याचा, कथा शास्त्राचा अभ्यास करून डोळस प्रयत्न केले पाहिजेत.अस मत कदम यांनी यावेळी सांगितले. देवगिरी शॉर्टफिल्म महोत्सवात एकूण 92 शॉर्टफिल्म,डाक्युमेंट्री आल्या आहेत त्यातील आज 54 शॉर्टफिल्म, डाक्युमेंट्री विविध सभागृहात दाखवण्यात आले. तीन सभागृहात दाखवण्यात आल्या. यात अभिनेता रमेश देव सभागृहात 12, अभिनेत्री रसिका जोशी सभागृहात 15, तर गीतकार जगदीश खेबुडकर सभागृहात 17 शॉर्टफिल्म, डाक्युमेंट्री दाखवण्यात आल्या.
या मोहोत्सवाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ गौरी राणे यांनी केलं तर सूत्रसंचालन किरण सोहळे यांनी केलं.आभार प्रदर्शन डॉ जयेंद्र लेकुरवाळे यांनी मानले.हा महोत्सव यशस्वी व्हावा यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.