धरणगाव प्रतिनिधी । शहरात काँग्रेसच्या वतीने डी.जी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले.
केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत काँग्रेसचे डी.जी.पाटील यांच्या प्रयत्नाने आज धरणगाव शहरातील भोई समाज मंदीर, भीमा भोई चौक, लोहार गल्ली, भाईवाडा येथे कोरोना लसीकरणाचा शुभांरभ करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. याप्रसंगी भोई समाज अध्यक्ष सुनील जावरे, फत्रू भोई, रतिलाल चौधरी, सम्राट परिहार, चंदन पाटील, विकास लांबोडे, जीवन भोई, खजिनदार राजेश भोई, बंटी पवार, राहुल पवार, दीपक भोई, रामचंद्र माळी, कैलास लांबोळे, पंकज भोई, आबा भोई, बबलू भोई, महेंद्र भोई, चेतन भोई, अश्विन भोई आदी उपस्थित होते. परिसरातील नगरीकांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.