Home Cities जळगाव शिष्यवृत्ती अर्जांची अडचण सोडवण्यासाठी तीव्र आंदोलनाचा अभाविपचा इशारा

शिष्यवृत्ती अर्जांची अडचण सोडवण्यासाठी तीव्र आंदोलनाचा अभाविपचा इशारा


53721454 291238898239326 6764903280263823360 n

जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत बेंडाळे महाविद्यालयात जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात शिक्षण घेणाऱ्या ओ.बी.सी., व्ही.जे.एन.टी. व एस.बी.सी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे सुमारे २५० विद्यार्थी त्याच्या लाभापासून वंचित आहेत. याबाबत लवकरच न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभाविपने दिला आहे.

 

याबाबत समाजकल्याण अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या संदर्भात समाजकल्याण विभाग आणि विद्यापीठ प्रशासन यांच्याशी चर्चा करूनही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही जबाबदारी सहाय्यक आयुक्तांनी घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्याव, अन्यथा अभाविपतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे व यु.आय.सी.टी. विभाग प्रमुख अमोल पाटील यांनी दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound