अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अकोला जिल्हयात काही अज्ञातांनी शेतात ठेवलेल्या साहित्याची नासधूस करत मोठे नुकसान केल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या ठिकाणी शेतात कापणी करून ठेवलेल्या ज्वारीच्या पीकाला आग लावल्याची घटना घडली आहे.
अकोला जिल्हयातील तेल्हारा तालुक्यातील कोठा शेत शिवारात शेतमालासह शेतीची उपयोगी साहित्यांना अज्ञातांनी आग लावल्याची घटना घडली आहे. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तीनी तब्बल दहा शेतकऱ्यांच्या शेतातील पाईप, स्प्रींकलर, स्टार्टरची तोडफोड केली आहे. कोठा शेतशिवार हा बागायाती परिसर असल्याने बारमाही इथे सिंचन राहते. त्यामुळ शेतातच पाईप, स्प्रींकलर आणि इतर साहित्य कायमच असते. दरम्यान या प्रकरणात तेल्हारा पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू केला आहे. तर या प्रकरणाची तात्काळ चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी केली आहे.
तर दुसरी घटना अकोला जिल्हयातील पणज येथे कापणी करून ठेवलेल्या ज्वारीच्या पीकाला आग लावण्याची घटना घडली आहे. अल्पभूधारक शेतकरी रवींद्र नवले आणि दिलीप नवले यांचे हे शेत आहे. शेतात कापणी केलेल्या ज्वारीच्या पीकाच्या गंजिला अज्ञात व्यक्तीने आग लावली आहे. या आगीत शेतकऱ्याचं ज्वारी पिक पूर्णपणे जळून ख़ाक झाले आहे. यात १ ते दीड लाखांपर्यत ज्वारी आणि कडबा आगीमध्ये जाळाला असल्याचा अंदाज आहे. या नुकसानीचा संबंधीत विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नवले यांनी केली आहे.