धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील जी.एस.लॉनच्या श्री मंगल कार्यालयात धरणगाव तालुक्यातील विविध विभाग प्रमुख यांची मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी आढावा बैठक घेतली. पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्याची झाडाझडती घेतल्याचे पहायला मिळाले.
भडगाव तालुक्यातील गोंडगाव अत्याचार प्रकारणी धरणगाव शहरात मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहभाग नोंदविला होता. त्यानंतर सकाळी ११ वाजता शहरातील जी.एस.लॉनच्या श्री मंगल कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील विविध विभागाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विकास कामांबाबत चर्चा करून प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागाच्या प्रमुखांना दिल्या.