वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील गांधी चौकातील एकाच्या घरातून दीड हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल असा एकूण अडीच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी २९ मार्च रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, बंडू संपत चौधरी वय-५४,रा. गांधी चौक वरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २९ मार्च रोजी मध्यरात्री झोपलेले असताना मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घरात ठेवलेले दीड हजार रुपयांची रोकड आणि एक हजार रुपये किमतीचा मोबाईल असा अडीच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बंडू चौधरी यांनी दुपारी १ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नागेंद्र तायडे हे करीत आहे.