भुसावळ (प्रातिनिधी) गस्तीवर असलेल्या पोलिसांनी शहरातील रजा टावर खडका रोड येथे एका संशयित चोरट्याला बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतले आहे.
आसिफ उर्फ बाबा काळ्या अस्लम बेग (वय-22 रा. आयन कॉलनी, भुसावळ) हा चोरी अगर घरफोडी सारखा गुन्हा करण्याचा उद्देशाने मध्यरात्री मिटून आला. पोलिसांनी त्याला हटकले असता,त्याने उडवाउडवीची उत्तरे दिलीत. असिफ विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. भाग 6 गुरंन 1/2019 मु. पो. ऍक्ट 122 क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे.कॉ. सुनील जोशी, पो.ना. सुनील थोरात, पो.कॉ. विकास सातदिवे, पो.कॉ.समाधान पाटील, पो.कॉ. बापूराव बडगुजर यांनी केली आहे.