जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (MBA) महाविद्यालयात आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रा. मकरंद गोडबोले यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थितांना ते म्हणाले की सावित्रीबाई फुले यांच्यामुळे या ज्ञान संकुलात महिलांना खरे अधिकार मिळाले. समाजाच्या बदलत्या संदर्भानुसार स्वतःला बदलून कुटुंबासह समाजाची जाणीव समृद्ध करणारी शक्ती म्हणजे स्त्री च आहे. महिलांनी कृषी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, संरक्षण, आर्थिक इ सर्व क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.
आज स्रियांनी कुटुंबाबरोबरच देशाचे व जगाचे नेतृत्व केले आहे हे विसरता काम नये. राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतांना महिलांनी त्यांची गुणवत्ता संपूर्ण जगाला दाखवून दिलेली आहे. जगावर व देशावर ओढवलेल्या कोरोना संकटातसुद्धा महिलांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. महिलांना कमी न लेखता आपण कुटुंबात महिलांचा आदर केला पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमात महाविद्यालयामधील MBA द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या तसेच महाविद्यालयामधील प्राध्यापिकांसोबत खेळ खेळण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील MBA, BBA, BCA च्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी मनाली तायडे, नम्रता कुरकुरे, नेहा राणे, विभूती पाटील, कांचन चौधरी या विद्यार्थिनींनी कविता सादर केल्या.
सदर कार्यक्रम हा महाविद्यामधील पुरुष मंडळींनी आयोजित केलेला होता. हिंदी चित्रपटांवर आधारित एक Quiz ठेवण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने बालपण, खोडकरपणा, तारुण्य, करियर, आई व सर्व काही असे 5 ROUND ठेवण्यात आले होते आणि यावर आधारित हिंदी छत्रपटांमधील गाणे, दृष्य इ. वर प्रश्न उपस्थितांना विचारले गेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे प्रा. चंद्रकांत डोंगरे व प्रा. चेतन सरोदे यांनी केले. तांत्रिक साहाय्य मयुर पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहेनत घेतली.
यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. आफ्रिन खान, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा.चारुशीला चौधरी, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. दिपक दांडगे, मयुर पाटील, गौरव पाटील, सागर चौधरी, गणेश सरोदे, प्रशांत किरंगे, जीवन पाटील, प्रफुल्ल भोळे, रुपेश पाटील, घनश्याम पाटील, रुपेश तायडे, जयश्री चौधरी, भावना ठाकूर इ. कर्मचारी उपस्थित होते.