Home Cities जळगाव जिल्ह्यात दुपारी १.०० पर्यंत २७.२३ टक्के मतदान

जिल्ह्यात दुपारी १.०० पर्यंत २७.२३ टक्के मतदान


EVM

जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यात दुपारी १.०० वाजेपर्यंत सरासरी २७.२३ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ७.०० मतदानाला सुरुवात झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी पावसामुळे मतदानाचा वेग कमी होता. पण लवकरच पाऊस थांबल्यावर अपेक्षेप्रमाणे वेग वाढला.

 

११.०० नंतर तर मतदानाला चांगलाच वेग येवून दुपारी १.०० वाजेपर्यंत २७.२३ टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यात एकूण ३४,५३,०६२ एवढे मतदार असून १.०० पर्यंत त्यापैकी ९,४०,४१६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला होता.


Protected Content

Play sound