देशांत चोवीस तासांत ८३ हजार कोरोनाबाधितांची नोंद

 

नवी दिल्ली, वृत्तसेवा । मागील काही दिवसांच्या तुलनेत देशातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी चोवीस तासांत देशात ८३ हजार ८०९ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर १ हजार ०५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर देशातील कोरोबाधितांच्या एकूण संख्येनं ४९ लाखांचा टप्पा पार केला आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८३ हजार ८०९ करोनबाधितांची नोंद करण्यात आलीअसून १ हजार ०५४ जणांचा मृत्यू झाला.यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४९ लाख ३० हजार २३७ इतकी झाली आहे. देशात सध्या ९ लाख ९० हजार ०६१ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ३८ लाख ५९ हजार ४०० जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, देशातील मृतांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. देशात आतापर्यंत ८० हजार ७७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मागील काही दिवसांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्यांना सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत देशात ५ कोटी ८३ लाख १२ हजार २७३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तर १४ सप्टेंबर रोजी देशात १० लाख ७२ हजार ८४५ जणांची करोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.

Protected Content