यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन शिवसेना पक्षात येथील शहरातील युवकांनी जिल्हाप्रमुखांच्या उपस्थित घेतला जाहीर प्रवेश. लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असतांना पक्ष प्रवेशाचे सत्र सुरू झाले असुन , यावल शहरात काल नगर परिषद व्यापारी संकुलनाच्या जवळ असलेल्या एका खाजगी फर्म हाऊस या ठिकाणी झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात शिंदे गट शिवसेना या पक्षात जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या उपस्थित अनेक युवकांनी जाहीर प्रवेश घेतला.
या जाहीर प्रवेश सोहळ्यास शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार, शिवसेनेचे यावल तालुकाप्रमुख राजु काठोके, तालुका उपप्रमुख रामभाऊ चौधरी, यावल तालुका संघटक गोलु राजेन्द्र पाटील,शहरप्रमुख पंकज बारी, यावल शहर उपप्रमुख सागर सपकाळे, फैजपूर शहरप्रमुख विलास तळेले, उपशहर प्रमुख सागर बारी, उपशहर प्रमुख राजु सपकाळे, उपशहर संघटक युवराज बारी व सौरभ भोइटे, कैलास भिल यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यावेळी जिल्हा पक्ष प्रमुख समाधान महाजन यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत करीत पक्षाच्या ध्येयधोरणा संदर्भात आपल्या मार्गदर्शनातुन जाणीव युवकांना करून दिली, यांनी घेतला पक्षात प्रवेश लोकेश सपकाळे, धिरज बडगुजर, विजय भोई, नेसाज सोनवणे, रवि भिल, कृष्णा भिल, लोकेश कोळी, कुणाल कोळी, नारायण भिल, फिरोज तडवी, कैलास भिल, सागर झोपे, पवन धनगर, युवराज बारी, लोकेश झांबरे, तुषार झांबरे, जावेद खान अफजलखान, सागर बारी, विशाल भोइटे, मोहीत राजपुत, हेमंत बारी, समीर खान नुरखान, विनायक कोळी, शुभम सांगलीकर, समाधान धनगर, भावेश धनगर , यश कोळी, रविन्द्र रावते, चेतन काळे, ऋषी खडसे, गणेश कोळी या पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संंताेष माळी यांनी केले तर सर्व प्रवेश करणाऱ्या उपस्थितांचे आभार पक्षाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी मानले .