पाचोरा प्रतिनिधी । शासनाची “महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल ऑफ एक्यूपंचर” परिक्षा नुकतीच घेण्यात आली होती. सदर परिक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून पाच ते सहा हजार डॉक्टर सहभागी झाले होते. त्यात वाणेगांव ता. पाचोरा येथील पोलिस पाटील तथा योगा व निसर्गोपचार तज्ञ डॉ. नितिन जमदाडे यांनी यश संपादन करत ते उत्तीर्ण झाले आहे.
तसेच तालुक्यातील वेरूळी येथील निसर्गोपचार तज्ञ डॉ. रविंद्र पाटील व तारखेडा येथील डॉ. बापू सोनवणे हे सुद्धा उत्तीर्ण झालेले आहेत. उत्तीर्ण डॉक्टरांचे परिसरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.