दारूबंदी विभागाने केलेल्या कारवाईत सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील देवूळवाडी, भोलाणे व इतर भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३० आणि ३१ डिसेंबर रोजी अवैध दारू विक्री करणाऱ्यांसह अवैधरित्या सुरू झालेल्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आले असून या कारवाईत सुमारे ५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ. व्ही.टी.भूकन यांनी बुधवारी १ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणाव अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाईला सुरूवात केली आहे. या अनुषंगाने ३० आणि ३१ डिसेंबर रोजी विविध भरारी पथकाने जळगाव तालुक्यातील देवूळवाडी, भोलाणे आणि इतर भागात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर धडक मोहिम राबविण्यात आली. यात परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूच्या भट्ट्या देखील उध्दवस्त करण्यात आले. ही कारवाई राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ. व्ही.टी.भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत ५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात दारूबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

Protected Content