मुंबई, लाइव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौरा तूर्त स्थगित करण्यात आला आहे. परंतु बेगडी हिंदुत्ववाद्यांसह सर्वांचा हिशोब पुण्याच्या सभेत चुकता केला जाईल असे मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनी ट्वीत करीत म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजीचा अयोध्या दौरा प्रकृतीच्या कारणास्तव तूर्त स्थगित केला. यासंदर्भात राज ठाकरे यांनीच ट्वीट करीत माहिती दिली होती. यावरून सर्वच राजकीय पक्षांकडून तर्क-वितर्क लढवत टीका केली जात आहे. यासंदर्भात अयोध्या दौऱ्या अगोदर २१ रोजी सभा होती त्याऐवजी २२ मे ला पुण्यात गणेश क्रीडा मंदिरात सकाळी १० वाजता सभा घेतली जाणार आहे. गदाधारी हिंदुत्व बेगडी हिंदुत्ववादी यांची बांग बंद होणार असून धर्मनिरपेक्षतावाद्यांचे बुरखे फाटणार असल्याचे मनसे प्रवक्ते गजाजन काळे यांनी म्हटले आहे.
तसेच राज ठाकरे यांच्या ५ जून रोजीचा अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर जो नेता राज्याच्या हितासाठी अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच नव्हे तर पंतप्रधानांवर देखील टीका करायला कचरत नाही तो नेता एका खासदाराच्या आव्हानाने निर्णय बदलणार नाही, त्यांचा अयोध्या दौरा तूर्त स्थगित म्हणजे आगामी काळात नक्कीच आहे, पण २२ मे ला होणाऱ्या सभेत सर्वांचा हिशेब चुकता होईल, असे मनसे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनी ट्वीत करीत म्हटले आहे.