मुक्ताईनगर प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये रस्त्याचे काम न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. अखेर नागरिकांनी स्वखर्चातून मुरूम टाकून रस्ता तयार केला. त्यामुळे रस्ते न झालेल्या भागात नगरपंचायत प्रशासनाने किमान मुरूम तरी टाकावेत, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
येथील नवीन बस स्टॅन्ड मागील पाण्याच्या टाकीजवळील रहिवाशांनी टाकला स्वखर्चातून मुरूम मागील काही दिवसापासून मुक्ताईनगर मध्ये पडणाऱ्या सतत पावसामुळे प्रभाग क्रमांक 13 रेणुका नगर बस स्टॅन्ड मागे पाण्याच्या टाकी जवळ येथे रस्त्यावर चिखल व पाण्याचे डबके साचल्यामुळे नागरिकांचे हाल होत होते काही दिवसापूर्वी रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे दोन ते तीन नागरिक त्या चिखलात पडले देखील होते. व ते जखमी सुद्धा झाले वारंवार स्थानिक नगरपंचायत प्रशासन मुख्याधिकारी यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार करून सुद्धा कुठलीच दखल प्रशासनाकडून घेतली जात नव्हती.
तसेच स्थानिक नगरपंचायत अधिकारी, नगरसेवक लोकांच्या होणाऱ्या या समस्यांकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे त्यामुळे या भागातील रहिवाशांनी स्वतः जबाबदारी घेऊन स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी दहा ट्रॉली मुरूम टाकून लोकांना होणारा त्रास व होणारे अपघात बाबत लोकांना दिलासा देण्याचे काम केले . तब्बल सातशे रुपये ट्रॉली प्रमाणे दहा ट्रॉल्या त्यांनी या रस्त्यावरची टाकल्या. यामध्ये सहभाग घेतलेले रहिवासी कैलास बावणे, बंटी भोलाने, सुधाकर फरदडे, युवराज चौधरी, योगेश शेकोकार, देवचंद्र तायडे, किशोर सुरळकर, गजानन मालगे, प्रदीप चौधरी, विजय सोनवणे, गजानन पाटील यांचा सहभाग आहे.