खामगाव, प्रतिनिधी । येथील एका खासगी कोविड केंद्रात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कोविड सेंटरमधून रुग्णास डिस्चार्ज देतांना त्याच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने त्याच्या पत्नीचे मंगळसूत्र ठेवून घेत पूर्ण बिल वसूल करून त्यास घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. विशेष म्हणजे हा धक्कादायक प्रकार हा औषध प्रशासनाचे मंत्री असलेले जिल्हा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
खामगाव शहरातील चार-पाच डॉक्टरांनी रुग्णालय भाड्याने देऊन खासगी कोविड सेंटर सुरू केले . हे तरुण, कोविड सेंटर दुर्गम भागातील आवार गावचे मंगेश गवई याना १३ तारखेला ठंडी आणि तापामुळे ९ दिवसांपासून भरती केली होते. त्यांचे बिल ८१ हजार घेण्यात आले होते. त्यात मारिज चंद्रपाल गवई यांनी ७० हजार रुपये जमा केले. घरून ११ हजार रुपये आणले, परंतु, डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की, जोपर्यंत रुग्णालयाचे पूर्ण बिल दिले जात नाही तोपर्यंत त्यांना डिस्चार्ज दिला जाणार नाही. शेवटी त्यांची पत्नी जयश्री गवई यांनी त्यांचे मंगळसूत्र दिले, त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णास घरी जाण्याची परवानगी दिली. लज्जास्पदबाब म्हणजे औषध प्रशासनाचे मंत्री असलेले जिल्हा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात ही घटना घडली आहे.