जळगाव, प्रतिनिधी । मच गया शोर सारी नगरी रे….सारी नगरी रे…..आया बिरज का बांका, संभाल तेरी गगरी रे…..असे म्हणत ढोल ताशांच्या तालावर थिरकणारी पावले आणि गोविंदा रे गोपाळा जयघोष करीत काव्यरत्नावली चौकात “तरुणींची दहीहंडी”ने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी आठ वर्षीय शुभदा खेडकर या विद्यार्थिनीने ५ थर रचून दहीहंडी फोडत जल्लोष केला.
युवाशक्ती फाउंडेशन, विद्या इंग्लिश मिडीयम विद्यालय, ज्ञानयोग वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नमो आनंद नोटबुक प्रायोजित काव्यरत्नावली चौकात “तरुणींची दहीहंडी” शनिवारी सायंकाळी ५ वाजता सुरु करण्यात आली. पुरुषांसह महिलांचा दहीहंडी उत्सवात सहभाग वाढावा हा यामागील प्रमुख उद्देश होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, उद्योजक भरत अमळकर, आनंद कोठारी, वुमनिया ग्रुपच्या पूजा मुंदडा, अनुभूती विद्यालयाच्या संचालिका निशा जैन, रायसोनी इन्स्तीट्युटच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल, संगीता पाटील, आयएमआर संस्थेच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे, अखील भारतीय मारवाडी महिला मंडळाच्या राजकुमारी बाल्दी, अध्यक्ष विराज कावडिया, सचिव अमित जगताप उपस्थित होते.
१०० वाद्यांच्या पथकाने वेधले लक्ष
मुंबई येथील प्रशिक्षकानी महिला गोविंदाना प्रशिक्षण दिले होते. दुपारी ४ वाजेपासूनच तरुणींची दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांचा उत्साह दिसून आला. अमळनेर येथील सिद्धार्थ व्यायाम शाळेच्या १०० वादकांच्या ढोल पथकाने महिला गोविंदाचे मनोबल वाढविले. ढोल ताशांच्या गजरात शहरातील महिला व तरुणींनी जल्लोष करीत महिला गोविंदाना प्रोत्साहन दिले. बेंडाळे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी डॉ.अनिता कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली रोप मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण वेशभूषा करून वातावरण भक्तीमय बनविले. याशिवाय सेल्फी स्पर्धा, ५ संघांचे सांस्कृतिक नृत्य सादर झाले. विजेत्या संघाला माजी महापौर विष्णू भंगाळे, पो.नि.अनिल बडगुजर, युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडिया, सचिव अमित जगताप, अध्यक्ष मनजीत जंगीड, संदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रशांत वाणी, शिवम महाजन, विनोद सैनी, -भवानी अग्रवाल, सौरभ कुलकर्णी,आकाश धनगर, पियुष हसवाल, विपीन कावडीया, पियुष तिवारी, तृषान्त तिवारी, राहुल चव्हाण, समीर कावडीया, आकाश कांबळे, करण शाह, दीपेश फिरके, नवल गोपाळ, पतेजस जोशी,रघुनाथ राठोड, मयूर जाधव, सागर पाटील यांनी परिश्रम घेतले.