जळगाव प्रतिनिधी । कामावरून गंधर्व कॉलनी येथे घरी पायी जाणाऱ्या तरूणाच्या हातातील १० हजाराचा मोबाईल अज्ञात दोन जणांना दुचाकीवरून धुमस्टाईल लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, हरिहंत प्रमोदचंद कांकरिया (वय-२२) रा. पार्वती अपार्टमेंट, गंधर्व कॉलनी हे खासगी नोकरी करतात. शहरातील कोठारी एजन्सीज येथे कामाला आहे. सोमवार २३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता कामावरून सुटी झाल्याने ते पायी गंधर्व कॉलनी येथे घरी निघाले. घराजवळून जात असतांना ते मोबाईलवर बोलत होते. त्याचवेळी दोन अज्ञात चोरटे समोरून दुचाकीवरून येवून त्यांच्या हातातील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून धुमस्टाईल लंपास केला. काही करण्याच्या आता दोन्ही चोरटे दुचाकीवरून पसार झाले. हरिहंत कांकरियानी लागलीच जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले व अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ तुषार जावरे करीत आहे.