जळगाव ( प्रतिनिधी ) जळगाव येथे आज रविवारी ( दि.3 फेब्रुवारी ) लेवा भवनात एक दिवसीय राज्यस्तरीय माळी उद्योजक प्रोत्साहन मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत सावता माळी यांचे 18 वे वंशज रविकांत वसेकर हे होते. प्रथम कार्यक्रमाची सुरूवात संत सावता माळी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पुजन करुन व दीपप्रज्वलन करुन झाली. प्रास्ताविक भूषण महाजन यांनी केले.
मेळाव्यात व्यवसाय कसा करावा, भांडवल कसे उभारावे, माल कसा उपलब्ध करावा, त्या वस्तुला मार्केट कसे मिळवावे, बॅकेकडुन काय काय योजना व्यवसायीक बांधवासाठी आहेत अशा विविध टिप्स देण्यात आला. तरुणांनी आता नोकरीच्या मागे न पळता व मोल मजुरीचे कामे करण्यापेक्षा व्यवसायात उतरावे, असे आवाहनही यावेळी समाजातील तरुणांना करण्यात आले. तसेच माळी समाजातील राज्यातील उद्योजकांना स्मार्ट उद्योजक पुरस्कार देण्यात आला. मदन वाघमारे पुणे, रमेश महाजन एरंडोल, सुजाता महाजन नाशिक, पंढरीनाथ नागणे, दिपक माळी धुळे, भगवान महाजन चाळीसगाव, सौ संध्या माळी साकळी, संतोष इंगळे जळगाव, अर्जुन गायकवाड औरंगाबाद, दिलीप पाटील पाळधी, भिमराव खलाणे चाळीसगाव, भगवान महाजन चाळीसगाव, यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. एच एस पाटील ( जिल्हा उद्योग केंद्र ) यांनी उद्योगाबाबत केंद्राकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची यावेळी माहिती दिली . श्रीकृष्ण महाजन ( सेवानिवृत्त शाखाधिकारी भारतीय स्टेट बँक ) यांनी बँकेत मिळणाऱ्या व्यवसायाची कर्जाबाबत माहिती दिली. उद्योजक व प्रदेशाध्यक्ष गोविंद सुमन किशोर ढगे यांनीही आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. त्यावेळी उत्तमराव महाजन, दत्ता माळी, भिमराव खलाणे, शालिग्राम मालकर, राज महाजन, प्रकाश महाजन, भगवान रोकडे, शशिकांत माळी, गुलाबराव वाघ, गुलाबराव देवकर, प्रताप पाटील, श्रीकृष्ण महाजन, अजिंक्य माळी, सुनील पाटील, प्रविण सपकाळे हे उपस्थित होते . कार्यक्रमांमध्ये फुले इंडस्ट्रीज यवतमाळ यांचे हळदीचे लोणचे याची लॉन्चिंग करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भूषण महाजन, कमलाकर माळी, महेंद्र माळी, ज्ञानेश्वर महाजन, भानुदास महाजन, शामराव महाजन, विनायक महाजन, शिवाजी महाजन, समाधान माळी, लोकेश महाजन, भगवान रोकडे, विजय महाजन, अप्पा महाजन व सर्व समाज बंधू – भगिनींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले तर आभार भूषण यांनी मानले.